माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम

 प्रस्तावना

१. केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करणे व माध्यमिक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने ने V-1 मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology-IBT), V-2 अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची मुलभूत तत्वे (Elements of Mechanical Engineering-EME) व V-3 विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मुलभूत तत्वे (Elements of Electrical and Electronics Technology-EEET) हे तीन बहुकौशल्ययुक्त पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 1996-97 पासून सुरु करण्यात आले होते.

2.सदर अभ्यासक्रम इ.09 वी व 10 वी स्तरावर राबविण्यात येतात.

3.इ.09 वी व इ.10वी स्तरावर हिंदी/संस्कृत ऐवजी खालीलपैकी कोणत्याही एक व्यवसाय अभ्यासक्रम निवडता येतात.

4. राज्यामध्ये सन 2015-16 पासून नविन पुनर्रचित अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

5. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम योजनेतंर्गत खालील अभ्यासक्रम राबविले जातात.

अनु.क्रं विषय अभ्यासक्रमाचे नाव
1 81 एम.एस.एफ.सी.(MultiSkill Foundation Course)
2 91 मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (MechanicalTechnology)
3 92 इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी (ElectricalTechnology)
4 93 इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (ElectronicsTechnology)
5 82 Automobile Technology
6 83 Retail Merchandising
7 84 Healthcare gen duty assist
8 85 Beauty and wellness
9 87 Tourism & Travel
10 88 Agriculture
11 89 Media & Entertainment
12 90 Bank & Fin. Service l1
13 90 Bank & Fin. Service l2

6. उक्त तक्त्यातील अनुक्रमांक 01 ते 04 व्यवसाय अभ्यासक्रम कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत तर अनुक्रमांक 01 व 05 ते 13 अभ्यासक्रम हे सम्रग शिक्षा अभियानअंतर्गत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेमार्फत राबविण्यात येतात.

[sontent]7.उक्त अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांचे मार्फत घेण्यात येवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.[/scontent] [sontent]8. उक्त तक्त्यातील अनुक्रमांक 01 ते 04 मधील व्यवसाय अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत तर अनुक्रमांक 05 ते 13 या व्यवसाय अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा या सेक्टर स्कील कौन्सिल मार्फत घेण्यात येतात व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्र देण्यात येते.[/scontent]  

माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची सन 2020-21 मधील प्रवेशाची सद्य:स्थिती

         
अनु.क्रं संस्थेचा प्रकार संस्थेची एकूण संख्या प्रवेश क्षमता प्रत्यक्ष प्रवेश (2020-21)
इ.09 वी इ.10 वी
1 शासकीय  169 26040 15896 19447
2 खाजगी अनुदानित 224 20472 16015 17472
3 खाजगी विनाअनुदानित 249 17660 6195 6004