धोरणे
प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम उदा. माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स,वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स, संगणक हार्डवेअर देखभाल, प्रगत मशीन साधन देखभाल इ. अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देणे
कमी रोजगारक्षमता असलेले अप्रचलित व्यवसाय / अभ्यासक्रम बंद करणे.
उद्योगजगत व संस्थांमध्ये जास्तीतजास्त सुसंवाद घडवणे.
प्रशिक्षण अधिक समर्पक आणि प्रभावी करणे.
उद्योगांची मागणी मान्य करणार्या कुशल कामगारांचा पुरवठा करणे.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाकरिता अधिकाधिक तरुणांना आकर्षित करणे.
पद्धतशीर प्रशिक्षणाद्वारे तरुणांच्या रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देणे.
सामान्य माणसासाठी व्यावसायिक शिक्षण सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिकरण 25% पर्यंत वाढविणे.
प्रशिक्षित कार्यबळ प्रदान करून देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी मदत करणे.