शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना
योजनेची पार्श्वभुमी
योजनेचे मुख्य उद्देश
- कारखान्यांच्या विविध कामांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे.
- युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन कारखान्यांत रोजगार मिळविण्यासाठी सक्षम बनविणे.
- युवकांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन उत्पादन व इतर सेवा क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.
- कामगारांना योजनाबध्द प्रशिक्षण देऊन औद्योगिक आस्थापनांचा दर्जा,गुणवत्ता व उत्पादन वाढविणे.
महाराष्ट्रातील शिल्पकार प्रशिक्षण योजनेची स्थिती
महाराष्ट्र राज्यात 419 सरकारी व 585 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ज्यात प्रवेश क्षमता 1,39,920आणि 1,03,456 आहे.
शासकीय औ.प्र.संस्था व अशासकीय औ.प्र.संस्था यामध्ये खालीलप्रमाणे एकूण 85 व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येते.
अभियांत्रिकी व्यवसाय | एकूण | बिगर अभियांत्रिकी व्यवसाय | एकूण | सर्व एकूण | ||
01 वर्ष | 2 वर्ष | 01 वर्ष | 02 वर्ष | |||
17 | 37 | 54 | 30 | 01 | 31 | 85 |
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा निर्धारित अभ्यासक्रमानुसार या अभ्यासक्रमाची प्रशिक्षण कौशल्ये दिली जातात.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे प्रमाणपत्र (एनसीव्हीटी) प्रशिक्षण निदेशालय, नवी दिल्ली यांचे मार्फत दिले जाते. हे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते.
संस्थेची संख्या आणि उपलब्ध जागांची संख्या (ऑगस्ट 2024)
औ.प्र.संस्थेचा प्रकार | संस्थांची संख्या | उपलब्ध जागा | ||
---|---|---|---|---|
शासकीय | खासगी | शासकीय | खासगी | |
सामान्य | 307 | 585 | 74724 | 58088 |
आदिवासी | 61 | 0 | 12324 | 0 |
महिला | 15 | 0 | 3776 | 0 |
आदिवासी आश्रम | 28 | 0 | 1412 | 0 |
एससीपी | 4 | 0 | 616 | 0 |
अल्पसंख्याक | 2 | 0 | 416 | 0 |
संरक्षण | 2 | 0 | 248 | 0 |
एकूण | 419 | 585 | 93516 | 58088 |
1004 | 151604 |
उपलब्ध मूलभूत सुविधांच्या जास्तीत जास्त वापरासाठी आणि कुशल मनुष्यबळाची संख्या वाढविण्यासाठी, महापालिका क्षेत्रातील हद्दीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३ पाळींमध्ये प्रशिक्षण दिले जाते. २३४ आणि १४२ सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये, क्रमशः २ पाळी व १ पाळीमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
शासकीय औ.प्र.संस्था निर्देशिका 2024-2025
खासगी औ.प्र.संस्था निर्देशिका 2024-2025
व्यवसाय निहाय शासकीय औ. प्र. संस्थांची यादी 2024-2025
व्यवसाय निहाय खाजगी औ. प्र. संस्थांची यादी 2024-2025
स्त्री शिक्षणासाठी प्राधान्य
व्यवसाय शिक्षणामध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, १५ औ. प्र.संस्था केवळ महिलांसाठीच सुरू केल्या आहेत. तसेच सन १९९० मध्ये सुरु केलेल्या व ज्या संस्थांमध्ये ६ व ८ व्यवसाय आहेत, व तिथे २ व्यवसाय महिलांसाठी राखीव आहेत; याव्यतिरिक्त ४ व्यवसाय असलेल्या संस्थांमध्ये १ व्यवसाय महिलांसाठी राखीव आहे.
औ. प्र.संस्था प्रवेश
सन २०१३ पासून महाराष्ट्रात ऑनलाइन प्रवेश पद्धती राबविण्यात येत आहे. पुढील तपशीलासाठी कृपया http://admission.dvet.gov.in इथे भेट देण्यात यावी.
प्रशिक्षण शुल्क / ठेवी / सवलत
अ.क्र. |
तपशिल | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था | खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था | ||||||
सामान्य श्रेणी | राखीवश्रेणी | IMC जागा | OMS | NRI | MS | OMS | NRI | ||
प्रशिक्षण शुल्क | |||||||||
1 | मशिन गट- अभियांत्रिकी व्यवसाय | 1200 | – | 30000 | 45000 | 60000 | 30000 एकत्रित | 60000 एकत्रित | 150000 एकत्रित |
बिगर मशिन गट- अभियांत्रिकी व्यवसाय | 1000 | – | 25000 | 37500 | 50000 | ||||
बिगर अभियांत्रिकी व्यवसाय | 800 | – | 20000 | 20000 | 40000 | ||||
2 | ओळखपत्र शुल्क | 50 | 50 | 50 | 50 | 50 | |||
3 | ग्रंथालय शुल्क | 100 | 100 | 100 | 100 | 100 | |||
4 | इंटरनेट सुविधा शुल्क | 100 | 100 | 100 | 100 | 100 | |||
5 | सांस्कृतिक कार्य शुल्क | 100 | 100 | 100 | 100 | 100 | |||
6 | वसतीगृह शुल्क | 1200 | 1200 | 1200 | 1200 | 1200 | |||
प्रवेशाच्यावेळी जमा करावयाची अनामत रक्कम | |||||||||
7 | प्रशिक्षण अनामत रक्कम | 500 | 500 | 500 | 500 | 500 | 500 | 500 | 500 |
8 | ग्रंथालय अनामत रक्कम | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 | 100 |
9 | वसतीगृह अनामत रक्कम | 1000 | 1000 | 1000 | 1000 | 1000 | 1000 | 1000 | 1000 |
*संबंधित प्रशिक्षण वर्षाकरिता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनिहाय एकत्रित शुल्क तपशिल http://admission.dvet.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आकारावयाचे शुल्क निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा कमी शुल्कआकारु शकतात. उमेदवारांनी संबंधित खाजगी औ.प्र.संस्थांशी विकल्प सादर करण्यापूर्वी व/वा प्रवेश घेण्यापूर्वी संपर्क करावा. |
वयोमर्यादा
प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी १४ वर्षे पूर्ण केले पाहिजेत. प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
निर्वाह भत्ता/विद्यावेतन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत आसलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखांच्या मर्यादेत आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून दर महा रुपये 500/- इतके दराने विद्यावेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक प्रशिक्षणार्थींसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती लागू आहे.
परीक्षा
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, अखिल भारतीय व्यवसाय चाचणी परीक्षा आयोजित करतात आणि यशस्वी उमेदवारांना तात्पुरते प्रमाणपत्र देतात. अंतिम प्रमाणपत्र प्रशिक्षण महानिदेशालय, नवी दिल्ली यांचेमार्फत दिले जाते.
औ. प्र. संस्थांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी
- औ. प्र. संस्थांमधून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी व्यवसायाशी संबंधित व्यावहारिक कौशल्ये मिळवतात आणि कुशल कामगारांच्या देखरेखीखाली उत्पादन कार्य करण्यास सक्षम असतात. या टप्प्यावर त्यांना अर्ध-कुशल कामगार म्हणून वर्गीकृत केले जाते.
- शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ च्या अंतर्गत, औ. प्र. संस्थांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायांसाठी पुरेशी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असलेल्या उद्योगांद्वारे नोकरी दिली जाते. अशा प्रकारे नोकरी दिलेले प्रशिक्षणार्थी उत्पादक / विक्रीक्षम कौशल्ये शिकतील आणि रोजगारासाठी उपयुक्त होतील.
- एनसीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, जर उमेदवार उद्योगासह नोकरी घेण्याऐवजी लहान व्यवसाय सुरू करण्यास तयार असेल तर अशा क्रियाकलापांना प्रोत्साहन देणाऱ्या व आवश्यक सहाय्य प्रदान करणाऱ्या सरकारी एजन्सींच्या सहाय्याने ते तसे करू शकतात.
एनसीव्हीटी एमआयएस
प्रात्यक्षिकांकरिता आवश्यक कच्चा माल