उद्दिष्टे
उद्दिष्टे
- उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे.
- कामगारांच्या पद्धतशीर प्रशिक्षणाने कामगारांची गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन वाढवणे.
- शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे.
कौशल्य आव्हाने
- रोजगारक्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे.
- विद्यापीठ पदवीधरांपैकी फक्त 13% पदवीधरांकाना रोजगार उपलब्ध आहेत.
- फक्त 5% तरुण व्यावसायिकाना प्रशिक्षण दिले जाते.
- भारत हा सर्वात तरुण देश असून 54% लोकसंख्या 30 वर्षांखालील असल्यामुळे जागतिक कौशल्य कार्यबल तयार करण्याची गरज आहे.
- सन 2020 पर्यंत भारताचे लोकसंख्याशास्त्रीय अधिशेष 47 दशलक्ष होईल.
- एकूण बेरोजगारांपैकी ६९% बेरोजगार व्यावसायिक कौशल्य रहित आहे.
महाराष्ट्र राज्यासमोरील आव्हाने
1 | लोकसंख्या | अंदाजे १० करोड |
2 | 11 ते 20 वर्षे वयोगटातील लोकसंख्या | २ करोड. |
3 | २१ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकसंख्या | २ करोड. |
4 | बालमजूर | 7, 64, 075 |
5 | अशिक्षित कामगार | 44.00% |
6 | चौथी पास कामगार | 22.60 |
7 | प्रशिक्षित कामगार | 33% |
8 | रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केलेल्या तरुणांची संख्या | 34, 81, 367 |
नवीन प्रशिक्षण सुविधा तयार करणे / विद्यमान पायाभूत सुविधा वापरणे
- राज्यातील उमेदवार प्रशिक्षण कायद्यांतर्गत येणारे विविध उद्योग जे त्यांच्या पायाभूत सोयीसुविधा वापरत आहेत, अशा उद्योगांना समाविष्ट करणे.
- उत्पादन संघटना ,उद्योग संघटना ,बांधकाम संघटना ,किरकोळ संघटना,ऑटोमोबाईल संघटना इ. संघटनाना समूह प्रशिक्षणामध्ये सहभागी करणे.
- हॉस्पिटल / हॉटेल्स / तपशील / रत्ने आणि ज्वेलरी / परिधान / प्रवास आणि पर्यटन / खाद्य प्रक्रिया इत्यादीसारख्या विशेष क्षेत्राना समाविष्ट करणे.
- कॉर्पोरेट सेक्टरचा समावेश.
- माध्यमिक शाळा / आश्रमशाळा / स्वयंसेवी संस्था / मास्टर शिल्पकार यांचा समावेश.
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा समावेश
- कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालये
- अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालये
- कृषी महाविद्यालये
- वैद्यकीय महाविद्यालये
- एचएमसीटी महाविद्यालये
अंमलबजावणीसाठी धोरण
राज्य सरकारची भूमिका
- मिशन मोडमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
- सर्व विभागांच्या सर्व प्रशिक्षण योजना एका छताखाली आणणे.
- सर्व जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय अभ्यासासाठी मनुष्यबळची जुळवाजुळव करणे .
- क्षमतेवर आधारित अभ्यासक्रमाची रचना करणे.
- प्रशिक्षण सामग्री तयार करणे.
- प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाची सुविधा.
- प्रशिक्षणासाठी अतिरिक्त आधारभूत संरचना.
- प्रशिक्षण गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी गुणवत्ता लेखापरीक्षणाची यंत्रणा.
- प्रशिक्षणार्थ्यांचे परीक्षा व प्रमाणन; प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र मूल्यांकन संस्था.
- रोजगाराचा पाठपुरावा करण्यासाठी यंत्रणा.
- विविध शासकीय / खाजगी विभागांचा स्वयंरोजगारासाठी संबंध जोडणे.
- योजनेची लोकप्रियता आणि प्रसिद्धी.