+२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational)

केंद्र शासनाच्या १९८६ च्या नविन शैक्षणिक धोरणानुसार +२ स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगार /स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राज्यात १९८८-८९ पासुन ७०% व्यवसाय शिक्षण व ३०% सामान्य शिक्षण अंतर्भूत असलेले किमान कौशलयावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.

प्रत्येकाची रोजगार क्षमता वाढविणे, कुशल कामगारांची मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधणे तसेच हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाभिमुख असल्याने विद्यार्थ्यांना संबधित व्यवसायाशी निगडीत किमान कौशल्य प्राप्त करुन स्वत:चा उद्योग सुरु करावा अथवा औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरी करावी आणि उच्च शिक्षणाकडे जाणारा लोंढा कमी व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.

या अभ्यासक्रमाचे किमान कौशल्यावर अधारीत अभ्यासक्रम हे नांव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक २/३/२००९ अन्वये बदलण्यात आले असुन ते उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम                    (H.S.C.Vocational )असे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक गटासह  अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेमधील पदविकेच्या (Diploma) व्दितीय वर्षामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.

सदर अभ्यासक्रम इ.11 वी व इ.12 वी स्तरावर राबविण्यात येतात

मराठी, इंग्रजी, जनरल फौंडेशन कोर्स, याबरोबरच खालीलपैकी +२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational) पैकी कोणत्याही एक अभ्यासक्रम निवडता येतो. त्या अभ्यासक्रमाचे तीन विषय (Paper- Paper-II Paper- III) असतात.

शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून या योजनेतील अभ्यासक्रम सुधारित करण्यात आलेले आहे.

सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांचेमार्फत घेण्यात येतात व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, शासन निर्णय दि.04.02.2021 अन्वये राज्यातील 53 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.  सबब, शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून या योजनेंतर्गतचे इ.11 वी चे प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत.

अशासकीय अनुदानित संस्थांतील +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे रुपांतर करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी विभागाच्या दि.16.03.2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मा.श्री.विक्रम काळे, विधानपरिषद सदस्य यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीची कार्यवाही सद्य:स्थितीत सुरु आहे.

+२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजनेतंर्गत खालील अभ्यासक्रम राबविले जातात.

अ.क्र. गटाचे नाव +2 स्तरावरील उच्च माध्यमिक  व्यवसाय  अभ्यासक्रमाचे नाव
1 तांत्रिक गट 1.इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी
2.इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी
3.मेकॅनिकल टेक्नॉलॉजी
4.ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी
5.कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
6.कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी
2 वाणिज्य गट 1.लॉजीस्टीक ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट
2.मार्केटिग रिटेल मॅनेजमेंट
3.अकौंटिग,फायनन्शियल ऑफिस मॅनेजमेंट
4.बँकींग,फायनन्शियल सर्व्हिसेस,इन्शुरन्स
3 कृषी गट 1.हॉर्टीकल्चर
2.क्रॉप सायन्स
3.ॲनीमल हसबन्डरी ॲण्ड डेअरी टेक्नॉलॉजी
4 मत्स्य गट 1. फिशरी टेक्नॉलॉजी
5 अर्धवैद्यकिय गट 1.ऑप्थॉल्मीक टेक्निशियन
2.रेडिओलॉजी टेक्निशियन
3. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
4.चाईल्ड,ओल्डऐज ॲण्ड हेल्थकेअर सर्व्हिस
6 गृहशास्त्र गट 1. फुड प्रॉडक्शन
2. टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट

+२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational) ची सन 2024-25 मधील प्रवेशाची सद्य:स्थिती

अ.क्र. संस्थेचा प्रकार संस्थांची एकूण संख्या प्रवेश क्षमता प्रत्यक्ष प्रवेश(2020-21)
Govt. Private Aided Private UnAided Govt Private Aided Private UnAided इ.11 वी इ.12 वी
Govt Govt Aided Private Govt Govt Aided Private
1 +२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational) 0 916 144 0 97450 11180 0 32111 1897 0 35343 2004
Total 1060 108630 34008 37347