+२ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम
सन 1964 मधील डॉ.कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने, रोजगार/स्वयंरोजगार करण्यांस प्रवृत्त करावे, जेणेकरुन महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबावावा. याउद्देशाने 1978-79 पासून राज्यात व्यवसाय विषयांची 30% व्याप्ती असलेले, +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यांत आले. सद्यस्थितीत तांत्रिक / वाणिज्य / कृषी / मत्स्य या गटातील एकूण 16 व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
सदर अभ्यासक्रम इ.11 वी व इ.12 वी स्तरावर राबविण्यात येतात.
इ.11 वी मध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांबरोबरच खालीलपैकी +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमापैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडता येतो. +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम निवडल्यास मराठी, हिंदी/संस्कृत, हिंदी व संस्कृत हे विषय नसतात.
सदर अभ्यासक्रम घेणा-या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेशाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.त्याचबरोबर अभियांत्रिकी शाखेमधील पदविकेच्या (Diploma) व्दितीय वर्षामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.
सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांचेमार्फत घेण्यात येतात व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.
+2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम योजनेतंर्गत खालील अभ्यासक्रम राबविले जातात.
अ.क्र. | गटाचे नाव | +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाचे नाव |
---|---|---|
1 | तांत्रिक गट | 1.इलेक्ट्रीकल मेंटेनन्स |
2.मेकॅनिकल मेंटेनन्स | ||
3.स्कूटर व मोटारसायकल दुरुस्ती | ||
4.जनरल सिव्हील इंजिनिअरींग | ||
5.इलेक्ट्रॉनिक्स | ||
6.कॉम्प्युटर सायन्स | ||
7.केमिकल प्लँट ऑपरेशन | ||
2 | वाणिज्य गट | 1.बॅकिंग |
2.मार्केटिंग ॲण्ड सेल्समनशिप | ||
3.ऑफिस मॅनेजमेंट | ||
4.स्मॉल इंडस्ट्रिज ॲण्ड सेल्फएम्लॉयमेंट | ||
3 | कृषी गट | 1.ॲनिमल सायन्स ॲण्ड डेअरी |
2.क्रॉप सायन्स | ||
3.हॉर्टिकल्चर | 4 | मत्स्य गट | 1. फिश प्रोसेसिंग टेक्नोलॉजी | [/str]
2.फ्रेश वॉटर फिशकल्चर |
सन 2020-21 मधील प्रवेशाची सद्य:स्थिती
अ.क्र. | संस्थेचा प्रकार | संस्थांची एकूण संख्या | प्रवेश क्षमता | प्रत्यक्ष प्रवेश (2020-21) | |||
---|---|---|---|---|---|---|---|
इ.11 वी | इ.12 वी | ||||||
1 | शासकीय | 49 | 7350 | 1897 | 2657 | ||
2 | खाजगी अनुदानित | 129 | 11499 | 7384 | 6409 | ||
3 | खाजगी विनाअनुदानित | 1512 | 153695 | 68189 | 101346 |